बाजारपेठेत व्यापा-याला भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून धमकी देणारा इसम
कोतवाली पोलीसांकडून जेरबंद*
दि. ३०/०९/२०२३ रोजी फिर्यादी नामे सुमित किरण सोनग्रा वय ३५ वर्षे धंदा-व्यापार, रा.
विराज कॉलनी डीएसपीचौक, अहमदनगर यांनी कोतावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, दिनांक ३०/०९/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मालकीच्या शु मॅक्स नावाच्या चप्पल व बुटाच्या दुकानात असतांना आरोपी
नामे इम्रान अल्ताब खान उर्फ बाबला हा तेथे नविन बुट घेण्यासाठी आला व बुटाच्या किंमतीवरुन यातील फिर्यादी यांच्याशी वादविवाद करुन फिर्यादीस शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देवून पळुन गेला आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे प.नॉ.कॉ. रजि. नं. १११३ / २०२३ भादंवि कलम ५०४, ५०६ प्रमाणे रजि दाखल करण्यात आला होता. सदर तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखुन पोनि चंद्रशेखर यादव यांनी तपासाचे चक्रे तात्काळ फिरवून गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना त्याचा शोध घेणेकामी कोठला परिसरात पाठविले. गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ कोठला परीसरात जावुन त्यास शिताफिने ताब्यात
घेतले आहे. पुढील कार्यवाही मपोसई शितल मुगडे या करत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मपोसई शितल मुगडे, पोना योगेश भिंगारदिवे, पोकॉ अभय कदम, पोकॉ/ संदिप थोरात, पोकॉ तेहसिन शेख, पोकों/ सुजय हिवाळे, पोकों अतुल काजळे, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकों सोमनाथ केकाण यांच्या पथकाने केली आहे.






