नगर: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरमध्ये राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ज्येष्ठ नेते माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके, सीताराम काकडे, नगर तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डीले, माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, शहर उपाध्यक्ष सुदामराव भोसले, सरचिटणीस सुरेश साठे, अभिषेक जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या लोकशाही विचारांनुसार जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कार्यरत राहण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.