नगर शहरातील खड्डे मोये मोये…सोशल मिडियावर ट्रेंड, नेटकरी उडवतायत खिल्ली

0
21

नगर : नगर शहर आणि खड्डे यांचे अतूट नाते नेहमीच चर्चेत असते. आताही मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने रस्त्यांची दुरवस्था पुन्हा समोर आली आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाले असून सोशल मिडियावर रस्त्यांच्या दुरवस्थेचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. नगरचे खड्डे मोये मोये अस कॅप्शन देत अनेकांनी व्हिडिओ शेअर केला आहे. महापालिकेत आता प्रशासक राज सुरु असून प्रशासनाने तरी शहरातील रस्त्यांची डागडुजी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.