नगरमध्ये ३१ जानेवारी मला प्लेसमेंट ड्राईव्ह, पात्रतेनुसार लगेचच संधी …

0
15

*प्लेसमेंट ड्राईव्हचे 31 जानेवारी रोजी आयोजन*
*इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन*
अहमदनगर जिल्हयातील उमेदवारांना खाजगी आस्थापनेमध्ये विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने 31 जानेवारी, 2024 रोजी सकाळी 11-000 वाजता प्रशासकीय इमारत, टी.व्ही.सेंटर, अहमदनगर येथे प्लेसमेंट ड्राईव (जागेवर नोकरीची संधी) आयोजन करण्यात आले असुन इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त नि.ना. सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जिल्हयातील २ ते ३ नामांकित कंपन्यांचे उ‌द्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे उमेदवारांची निवड करणार आहेत. एसएससी,एचएचसी, सर्व शाखेतील पदवीधर, एमएससी (अॅनालेटिकल केमेस्ट्री), बीबीए/एमबीए आदी शैक्षणीक पात्रता धारक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उ‌द्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करून पात्रतेनुसार उ‌द्योजकांकडे अप्लाय करावे.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0241-2995735 किंवा प्लेसमेंट ड्राईव्ह समन्वयक यंग प्रोफेशनल वसीमखान पठाण मो. नं. 9409555465 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.