‘चित्ररंग’ उपक्रमांतर्गत रविवारी नगरमध्ये संदीप सावंत दिग्दर्शित सिनेमा रसिकांच्या भेटीला
नगर: अहमदनगर फिल्म फाऊंडेशनने ‘चित्ररंग’ नावाचा उपक्रम सुरु केला आहे. गौतम मुनोत प्रोडक्शन्स एलएलपी आणि अहमदनगर फिल्म फाऊंडेशन ह्या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्ररंग’ हा उपक्रम चालतो.याच अंतर्गत सुमित्रा भावेंच्या निवडक ५ चित्रपटांची मालिका विविध महिन्यात दाखवण्यात आली. आता रविवार दि .१८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘चित्ररंग’ उपक्रमातला संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नावच नाही”हा सिनेमा दाखवला जाणार आहे.हॉटेल अर्थ, नेवासकर पेट्रोल पंपा शेजारी , अहमदनगर येथे हा सिनेमा दाखवला जाणार आहे, अशी माहिती गौतम मुनोत यांनी दिली.
विविध भाषिक चित्रपटांनी समृद्ध असलेल्या आपल्या देशात बऱ्याच मुख्य प्रवाहातील हिंदीतले चित्रपटकर्ते कायमच लक्षात राहतात. काही प्रमाणात हिंदीतही समांतर चित्रपट करणारी माणसे लक्षात राहतात. पण प्रांतिक भाषेत म्हणजे मराठीत समांतर सिनेमा करूनही देशभर नव्हे तर जगभर गाजलेली काही नावे आहेत. त्यात दिग्दर्शक सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, संदीप सावंत ही नावे नेहमीच समोर येतात. संदीप सावंत हे सुद्धा सिनेमा क्षेत्राचं औपचारिक शिक्षण न घेतलेला माणूस. त्यांचा ‘श्वास’ हा सिनेमा मैलाचा दगड समजला जातो. त्यांचा श्वास नंतरचा चित्रपट म्हणजे ‘नदी वाहते’.
त्यांच्या लघुपटांचे आणि चित्रपटांचे विषय हे समाजाशी निगडित घटकांचे आढळतात. श्वास सिनेमाला सुवर्णकमळ मिळालेलं आहे. यातूनच त्यांची या माध्यमांवरील पकड लक्षात येते. याच अनुषंगाने त्यांचा चित्रपट नगरकर सिने रसिकांना पहायला मिळणार आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क -9850712173.