अहमदनगर बाजार समितीत सोयाबीन बाजार भाव
सोयाबीन ने हळूहळू पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज राहाता बाजार सामितीत सोयाबीनला 5111 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला आहे.
आज (मंगळवार) सोयाबीनला सरासरी 5111 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2650 रुपये भाव मिळाला. तर बाजरीला सरासरी 2121 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.






