Sunday, May 12, 2024

नगर शहरातील व्यापारी वर्गाने नरेंद्र मोदींसाठी भाजपला साथ द्यावी, मंत्री विखे यांनी घेतली बैठक

भाजपाचे लोकसभेचे उमेदवार खा.सुजय विखे प्रचारार्थ व्यापार्‍यांची बैठक

नगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांच्या काळात देशाला जगात प्रतिष्ठा मिळवून दिले आहे, आजपर्यंत झालेली नाहीत, एवढी विकास कामे करुन देशाला प्रगतीच्या शिखरावर पोहचविले आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी काम व लाभाच्या योजना सुरु करुन आर्थिक स्थैर्य दिले आहे. त्यांनी घेतलेला निर्णय बदलावा अथवा मागे घ्यावा लागला नाही, अशी एकही घटना अद्याप घडलेली नाही, यावरुन त्यांचे निर्णय किती योग्य आहेत हे दिसते. व्यापारी वर्गासाठीही त्यांनी अनेक सुविधा देत स्थैर्य दिली आहे. सर्वांना अभिमान वाटेल, असेच काम नरेंद्र मोदी यांनी केलेले असल्याने त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्व व्यापारी वर्गाने भाजपाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे महसुल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

भाजपाचे लोकसभेचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सकाळी आडते बाजार येथे व्यापार्‍यांशी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी हितगुज साधले. याप्रसंगी शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, लोकसभा निवडणुक प्रमुख बाबासाहेब वाकळे, संयोजक व शहर सरचिटणीस प्रशांत मुथा, सचिन पारखी, मर्चंटस् बँकेचे संचालक अमित मुथा आदिंसह मोठ्या संख्येने व्यापारी व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी अमित मुथा म्हणाले, व्यापारी वर्गाच्या अनेक समस्या व प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी मंत्री राधाकृष्णजी विखे व खा.सुजय विखे यांनी प्रयत्न केले आहेत, असे सांगितले. सीए किरण मनियार यांनी भारताची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन पासून 30 ट्रिलियन पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आहे. त्यामुळे भारत जगात आर्थिक महासत्ता होईल, हे निश्चित

प्रास्तविका प्रशांत मुथा म्हणाले, खा.डॉ.सुजय विखे यांनी आपल्या मतदार संघाच्या विकासाचा आलेख उंचावला आहे. आगामी काळात होणार्‍या विकास कामाचा संकल्प आराखडा निश्चित झालेला असून, लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल, व्यापारी वर्गाने त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मागे व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गोपाल वर्मा, महेश गुगळे, महेश हेडा, संगेत गुरव, राजेश गुगळे, यश मुथा, संजय ताथेड, रुपेश वर्मा, पप्पू मुंदडा, दिपक देहरेकर, अनिल आनेचा, संजय कांगला, लक्ष्मीकांत तिवारी, धीरज कोठारी, चेतन कांकरिया, संजय लुंकड, रामेश्वर झंवर, देवकिसन मणियार, महेश बिहाणी, किरण मणियार, योगेश बजाज, राजेंद्र मालू, अतुल डागा, सुधीर मुनोत, सागर देसर्डा, ओमप्रमाश खंडेलवाल, रसिक कटारिया, सुनिल जक्कन, संंतोष देडगावकर, आशिष खंडेलवाल, उमेश तिवारी, गौरव मुनोत, अतिष कर्नावट, गौतम मुथा, निरज राठोड, विजय ताथेड, अविनाश साखला, चेतन बोरा, सुरेश मुथा, प्रमोद मुथा, दिपक मुथा, यश मुथा, राजेंद्र आगरवाल, ईश्वर गांधी, प्रशांत बुर्‍हाडे, हर्षल बोरा, सुरेश लालबागे, भरत जाखोटिया, राहुल जामगांवकर, सुनिल तावडे, बाळासाहेब गायकवाड, सुहास पाथरकर, बंटी ढापसे आदिंसह व्यापारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles