Sunday, May 12, 2024

मित्र म्हणून माझा डॉ. सुजय विखे-पाटील यांना सल्ला आहे… उमेदवारी अर्ज मागे घ्या, नामुष्की टळेल…

माझे मित्र डॉ. सुजय विखे-पाटील यांना विजयासाठी डमी उमेदवाराचा आधार घ्यावा लागतो, यावरूनच नगरच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झालाय. आता पराभूत होण्याची नामुष्की पत्करण्यापेक्षा अर्ज माघारी घेतला तर सन्मान तरी राहील, असा मित्र म्हणून माझा डॉ. सुजय विखे-पाटील यांना सल्ला आहे,’ असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

पारनेरच्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नीलेश साहेबराव लंके (रा. कामोठा, जिल्हा. रायगड) यांच्या नावाचा समावेश करून लोकसभा निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज भरून विखे पाटील डमी राजकारणाचा खेळ खेळत आहेत. गेली 50 वर्षे त्यांनी हेच केले. आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत नीलेश ज्ञानदेव लंके यांनी विखे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे. यातून विखे परिवार पुरता हादरला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles