ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी नुकताच एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे; जो सध्या चर्चेत आहे.
नाम मनसु या दाक्षिणात्य गाण्यावर या जोडप्यानं डान्स केला आहे. जबरदस्त डान्स स्टेप्स करीत या जोडप्यानं एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स दिला आहे. “आम्ही ट्रेंड फॉलो करीत आठवणी गोळा करतोय,” अशी सुंदर कॅप्शन ऐश्वर्या नारकर यांनी या व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे; तर अविनाश नारकर यांनी तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे.