Saturday, May 18, 2024

अजित पवारांचा पहाटेच्या शपथविधीबाबात आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सरकार स्थापन करण्याचं निश्चित केलं होतं. पण त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं. पण ते सरकार फक्त 78 तास टिकलं होतं. पहाटेच्या त्या शपथविधीच्या घडामोडींबाबत अजित पवार यांनी आज इंदापुरात मोठा खुलासा केला.

“2004, 2009, 2014 आणि 2019 मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करते होते”, असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांना टोला लगावला. “देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मी, खासदार प्रफुल्ल पटेल आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे ठरलं. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. अमित शाहांचा मला फोन आला. तुम्ही शब्द दिला तो तुम्हाला पाळावा लागेल. त्यावेळी मी शब्दाचा पक्का होतो. मी शपथ घेतली. ते म्हणाले, तुम्हाला शब्द पाळावा लागेल. दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घेण्याचं ठरलं. मी शपथ घेतली. नंतर ते सरकार टीकू शकलं नाही”, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

“हर्षवर्धन पाटलांशी आमची बैठक झाली होती. महायुतीत आपल्याला एकत्र काम करायचं असं ठरलं. अमित शाहांसोबत लढायचं ठरलं. साखर कारखाने अडचणीत आले. ते अमित शाहांनी सोडवलं. अंकीता पाटलांनी सांगितलं त्यांना मी सांगतो अजित पवार हा शब्द पाळणार आहे. देवेंद्रजींची ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आचारसंहितेचे काही नियम असतात. ते पाळावे लागतात”, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles