Friday, May 3, 2024

मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका…जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडेंना सुनावलं..

माजी मंत्री पंकजा मुंडेंनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता त्यांच्या उपोषणाच्या भूमिकेवरून टोला लगावला होता. त्याला शुक्रवारी मनोज जरांगेनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून ‘माझ्या वाटेला जाऊ नका’ अशा शब्दांत पंकजा मुंडेंना सुनावले आहे.

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात वक्तव्य केले होते. ‘विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिला आहे. बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही.’, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला होता.
बीडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी मुंडे यांना उत्तर दिले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘पंकजा मुंडे काय म्हणाल्या हे मी ऐकलले नाही. मी त्यांना विरोधक मानलेले नाही, समाजालाही नाही. मी तुमच्या वाटेला गेलो नाही, माझ्या वाटेला जाऊ नका.’ त्यामुळे जरांगे पाटील यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles