Monday, May 6, 2024

व्हायरल व्हिडीओ…‘आज या ठिकाणी…’ तरुणाने हुबेहूब केली अजित पवारांची नक्कल

व्हायरल व्हिडीओमध्ये या तरुणाने हुबेहूब अजित पवारांची नक्कल केली आहे. पत्रकार परिषदेत अजित पवार जसे बोलतात, तसे सेम टू सेम या तरुणाने बोलून दाखवले आहे. अजित पवार यांच्यासारखा आवाज काढत त्यांच्याच बोलण्याच्या शैलीत हा तरुण नक्कल करत आहे. तुम्ही जर अजित पवारांचे पत्रकार परिषदमधील सर्व भाषण ऐकले किंवा पाहिले असेल तर तुम्हाला जाणवेल की हा तरुण हुबेहूब त्यांची नक्कल करत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या तरुणाच्या शेजारी दोन तरुण उभे आहेत आणि व्हिडीओमध्ये काही जण त्यांना प्रश्न विचारत आहे. त्यावर हा तरुण अजित पवारांची नक्कल करून उत्तर देताना दिसतो.त्याचे हातवार आणि चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा हुबेहूब अजित पवारांसारखे दिसताहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles