Akshaya Deodhar अक्षयाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती मस्तपैकी उखाणा घेताना दिसतेय. तिच्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अलीकडे अक्षयानं एका फॅमिली प्रोगामला हजेरी लावली होती. तेव्हा सर्वांच्या आग्रहाखातर अक्षयानं लाजत मुरडत हार्दिकसाठी खास उखाणा घेतला. ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, हार्दिक रावांच नाव घेते कारण तो आहे माझा होणारा नवरा,’ असा तिचा उखाणा ऐकून सगळ्यांनीच तिचं कौतुक केलं.. या व्हिडीओत अक्षया जांभळ्या रंगाच्या साडीत दिसतेय. या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा व पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.