‘गंगुबाई काठियावाडी’…चिमुरड्या मायराचा ‘ढोलिडा’ गाण्यावर भन्नाट डान्स, पहा व्हिडिओ

0
1572

alia bhatt gangubai kathiawadi
..माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. एवढ्या लहान वयात उत्तम अभिनय करुन मायराने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा आहे. अलिकडेच तिने आलियाच्या ढोलिडा या गाण्यावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये ती ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील सुपरहिट ठरलेल्या ‘ढोलिडा’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आतापर्यंत या गाण्यावर बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी व्हिडीओ शेअर केले. मात्र, मायराचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.