अपक्ष नवनीत राणा यांना भाजपकडून बक्षीस… अमरावतीतून कमळ चिन्हावर उमेदवारी जाहीर

0
13
rana

भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. राज्यांच्या जागेसाठी ही तिसरी यादी आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा या भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे.