Amazing Video
माणसांची प्राण्यांशी मैत्री असते. पण सिंहाशी मैत्री कोण कधी काय करू शकतो आणि जरी सिंहाशी मैत्री करण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याचं काय होईल, याची कल्पनाही न केलेलीच बरी. असं असताना या व्यक्तीने तशी हिंमत केली.
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक सिंह दिसतो. हा सिंह एकटा नाही. तर त्याच्यासोबत एक माणूसही दिसतो. आता माणूस दिसल्यानंतर सिंहाने जसं रिअॅक्ट होणं अपेक्षित होतं तसा तो बिलकुल रिअॅक्ट झालेला नाही. ना सिंहाने या माणसावर हल्ला केला आणि माणूस या सिंहाला घाबरताना दिसतो. उलट तो हसत हसत, आनंदात या सिंहासोबत खेळतो आहे. दोघंही एकत्र मस्ती करताना, फिरताना दिसत आहेत.