Amitabh Bachhan ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘ब्रम्हास्त्र’मधील बिग बी यांचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. धर्मा प्रॉडक्शनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ यांचा रुपेरी पडद्यावर कधी न पाहिलेला लूक दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ यांच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखम दिसत आहे. हातात तलवार आहे. तसेच त्यांची नजर समोरच्याला थक्क करणारी आहे.






