माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गाणी सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर तुफान व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. सुप्रसिद्ध गायक शान अर्थात शांतनू मुखर्जीसोबत एक डुएट रोमँटिग साँग त्या गाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.
अमृता फडणवीसांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये हे गाणं ज्या चित्रपटासाठी गायलं जाणार आहे, त्या चित्रपटाचं नाव देखील जाहीर केलं आहे. पंडित ललित यांचं संगीत, संजय चेल यांचे गीत आणि पटकथा असणारा हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात म्हणजे पुढच्याच महिन्यात रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी दिली आहे.
At the screening of my Romantic song with co-singer @singer_shaan ,coming soon in upcoming movie-
‘Love 💗 you लोकतंत्र’ a Humorous Political Satire,Thriller.
Music @pandit_lalit , screenplay & Lyrics -Sanjay Chel, Produced by Zurich Media House LLP.
Movie & Music release-Aug’22! pic.twitter.com/wmrAakV69h— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) June 10, 2022