‘चंद्रमुखी’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच अमृता उत्तम नृत्य करते याची कल्पना आपल्याला आहेच मात्र, मध्यंतरी एका युट्यूब चॅनेलवर भारुड सादर करत अमृताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने सादर केलेल्या भारुडाची चांगलीच चर्चा रंगली होती. युट्यूबनंतर आता थेट एका पुरस्कार सोहळ्यात अमृता भारुड सादर करताना दिसणार आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर ‘झी मराठी’ वाहिनीवर संपन्न होणाऱ्या ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळ्यात भारुड सादर करुन रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. हे अनोखे सादरीकरण करताना अमृताला ‘अभंग रिपोस्ट’ हा म्युझिकल बॅंड साथ देणार आहे