Wednesday, April 24, 2024

बच्चू कडू म्हणाले…. नवनीत राणांना पाडणं हेच आमचं लक्ष्य, भाजपा कार्यकर्त्यांनी लाचारी

नवनीत राणांना तिकिट दिलं ही भाजपाची मर्जी आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही. आम्ही आमचं काम करु व्यवस्थित. उमेदवारी देऊन विजय मिळवता येतो का? तसं न झाल्यास चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणांना पाडता येतं का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे.” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

अमरावतीतलं चित्र हे अमरावतीकरांच्या मनातलं असेल. जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र झालं पाहिजे. आपल्यापेक्षा ज्याला पाडायचं आहे ते लक्ष्य मनात ठेवलं पाहिजे. कोणता उमेदवार निवडून येतो त्यापेक्षा नवनीत राणांना पाडणं हे लक्ष्य असलं पाहिजे. रवी राणा घरात घुसून मारण्याची भाषा करतो, कुठेही गेलं तरी पैसे खायचे. आता पाहू पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिकपणात दम आहे. स्वाभिमान पक्ष विकून भाजपाच्या दावणीला आम्ही बांधला नाही. दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो. बाकी माझ्या मनात काहीही नव्हतं असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला होता. त्यामुळेच आम्ही बरोबर आहोत. आमच्या मतदारसंघात खोके घेणारा नाही दणके देणारा आमदार आहे हे दाखवून देऊ.

रवी राणाने भाजपाचं कार्यालय फोडलं होतं. भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. आता काय वेळ आली पाहा. एवढी लाचारी कुणावर येऊ नये. याच रवी राणाचा जयजयकार कार्यकर्त्यांना करावा लागत असेल तर स्वाभिमान गेला आणि अभिमानही गेला.” असं बच्चू कडू म्हणाले आहेत. टीव्ही ९ मराठीशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी हे वक्तव्य केलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles