Saturday, April 27, 2024

पक्षाने तिकीट नाकारल्याने खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारादरम्यान मृत्यू

तामिळनाडूचे खासदार गणेशमूर्ती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ड्रविड मुन्नेत्र कझगमचे पक्षाचे नेते , खासदार गणेशमूर्ती यांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज गुरुवारी सकाळी खासदार गणेशमूर्ती यांनी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू इरोड लोकसभा मतदारारसंघात द्रमुक पक्षाने गणेशमूर्ती यांचं तिकीट कापलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना २४ मार्चला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.
पीटीआयच्या माहितीनुसार, खासदार गणेशमूर्ती यांना रुग्णालयात तपासानंतर आयसीयूमध्ये दाखल केलं होतं. तर त्यानंतर ते व्हेंटिलेटरवर होते. पुढे त्यांना कोयंबटूरमधील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं. खासदार गणेशमूर्ती यांच्या तब्येतीविषयी माहिती घेण्यासाठी मंत्री एस मुथुसामी, भाजप आमदार डॉ. सी सरस्वती, अन्नाद्रमुक नेते केवी रामलिंगम हे रुग्णालयात पोहोचले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles