Tuesday, May 13, 2025

पंकजा मुंडे म्हणाल्या , आरक्षणाचे हिरो मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांची भक्ती करा…

पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या नेकनूर येथील सभेत मराठा समाजाला आवाहन करताना नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला. गेली 60-65 वर्षे हे झोपले होते का, आता आरक्षणच्या मुद्द्याला मुखवटा बनवून राष्ट्रवादीचे लोकं मतं मागत आहेत. गेल्या 50-60 वर्षे त्यांना कधीच वाटलं नाही, जातीचं बघावं, असे म्हणत पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्लबोल केला.

आरक्षणाचा हिरो कोण आहे?, हो जरांगे पाटील आहेत. त्यांची भक्ती करा ना, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जा, त्यांच्या पोस्ट टाका, त्यांचं त्याग, बलिदान, त्यांचं कष्ट याचा आम्हाला आदरच आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले ते भाजप सरकारनेच दिलं. मात्र, ह्यांच सरकार ते आरक्षण कोर्टात टिकवू शकले नाहीत. गेली 60-65 वर्षे झोपले होते का, त्यामुळे या भुलथापांना बळी पडू नका,असे आवाहन पंकजा मुंडेंनी नेकनूर येथील जाहीर सभेतून बीडकरांना केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles