सध्या तरुणाईमध्ये आयफोनची क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकजण काटकसर करून आयफोन खरेदी करतात आणि आपली हौस पूर्ण करतात. महागडा आयफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशात रस्त्यावर भीक मागून आपलं पोट भरणाऱ्या व्यक्तीने iphone घेतला असं म्हटलं तर तुमचाही विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. एका भिकारी व्यक्तीने स्वत: चिल्लर जमा करून आयफोन खरेदी केला आहे.
सोशल मीडियावर या व्यक्तीचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. रस्त्यावर अनेक व्यक्ती दोन वेळच्या जेवणासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात. परिस्थितीमुळे त्यांच्यावर अशी वेळ येते. मात्र या वेळेला देखील छेद देण्याची हिंमत उराशी बाळगून एका भिकारी व्यक्तीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे.
त्याने दोन ते तीन गोन्या भरून भीक मागून पैसे जमवलेत. यामध्ये एकही नोट नाही. सर्व दोन, पाच आणि १० रुपयांची नाणी आहेत. ही सर्व चिल्लर घेऊन हा व्यक्ती आयफोन शॉपमध्ये आलाय. शॉपमध्ये येताच इतर व्यक्ती त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात.
मला आयफोन खरेदी करायचा आहे असं हा भिकारी व्यक्ती सांगतो. त्यानंतर त्याच्या गोनीमधील सर्व चिल्लर बाहेर काढली दाते. तब्बल २ ते ३ तास दुकानातील कर्मचारी चिल्लर मोजत असतात. शेवटी आयफोनसाठी लागतील इतके पैसे या व्यक्तीकडे असल्याचे समजल्यानंतर त्याला फोन दिला जातो.