नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांचे सर्व राजकीय पक्षाला वेध लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. शरद पवार यांच्या मागणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.
शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं होतं. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह स्वीकारावं लागलं. तसेच त्यांना पक्षाचं नावही बदलावं लागलं. शिवसेना फुटीनंतर पक्षनिधीचा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोग आणि कोर्टात पोहोचला होता.
यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी नव्हती. यानंतर पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर आज गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी दिली.