Video: पेट्रोल पंपावर बाईकने घेतला पेट, क्षणात आग भडकली; नागरिकांची पळापळा

0
17

कानपूरमध्ये एका पेट्रोल पंपावर अचानक एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर दुचाकीला अचानक आग लागल्याने आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप केला होता. त्यामुळेच देशातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच पेट्रोल पंपावर खूप जास्त गर्दी होत आहे. याच गर्दीत एका दुचाकीला पेट्रोल पंपाच्या बाजूला आग लागली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.