व्हिडीओ ajit_navghane_official_07 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील आजोबा भरदाव वेगानं बाईक चालवतायेत. त्यांच्या बाईकचा वेग इतका जास्त आहे की कारला सुद्धा ते मागे सोडतायेत. पण लक्षवेधी बाब म्हणजे ते नुसती बाईक चालवत नाहियेत तर सोबतच स्टंटबाजी देखील करतायेत. ते कधी हँडल सोडून उड्या मारतायेत. तर कधी पाय सोडून झोपतायेत. असे स्टंट तर तरुण मुलांना सुद्धा करणं झेपणार नाही. पण हे खतरनाक स्टंट ते अगदी सहजगतीनं करतायेत.