भारतीय जनता पक्षाने सध्या आपला सर्व फोकस लोकसभा निवडणुकांवर केंद्रीत केला आहे. त्यासाठी त्यांचा महाराष्ट्रात ४५ प्लस हा नारा आहे. मात्र ग्राऊंड रिपोर्ट काही वेगळेच सुचीत करीत असल्याने भाजपचे नेते अस्वस्थ आहेत. त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापासून तर अनेक नेते सातत्याने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर नाशिकच्या दौऱ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ कोणाला? या वादावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा कल्याणचे खासदार डॉ. एकनाथ शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असे सुचक वक्तव्य केले आहे.
खासदार शिंदे जर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असतील तर त्यांचा गट जो, खरी शिवसेना आम्हीच असा दावा करत आला आहे, त्याचे भाजपमध्ये विलीनीकरण होईल. अपात्रतेच्या संकटातून वाचण्याचा तो एक कायदेशीर मार्ग आहे.