Bollywood movie…
आमिर खानच्या बहुप्रतीक्षित ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तब्बल 100 दिवस 100लोकेशन्सवर शुट करण्यात आलेला लाल सिंह चड्ढा या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ट्रेलरमधून आमिरचा धमाकेदार लुक समोर आला आहे. सिनेमात आमिर एका पंजाबी सरदाराची भूमिका साकारत आहे. आमिरसह सिनेमात अभिनेत्री करिना कपूर खान देखील समोर आली आहे. सिनेमात साऊथ अभिनेता नागा चैतन्य देखील दिसणार आहे. करिना सिनेमात विम्मीची भूमिका साकारत आहे. विम्मी जिचं लाल सिंगवर प्रचंड प्रेम असते. लाल सिंह चड्ढा या सर्वसामान्य मुलाच्या आयुष्याची असामान्य गोष्ट दाखवण्यात आली आहे. तसेच भारतीय इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी सिनेमात दाखवण्यात येणार आहेत.