केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने पैसे मिळतील. केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी गट-ब अराजपत्रित अधिकारी आणि गट-क कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला. केंद्र सरकारच्या या निर्णयामध्ये पॅरा मिलिटरी फोर्सच्या जवानांचाही समावेश केला जाईल, ज्यांना जास्तीत जास्त ७,००० रुपयांपर्यंतचा दिवाळी बोनस दिला जाईल.
केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (ॲड-हॉक बोनस) चा लाभ उपलब्ध होईल, असे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने म्हटले आहे. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबरला आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या निवेदनानुसार, या बोनसचा लाभ ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवेत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळेल






