उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीदेखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिरसाट म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं खरं आहे. पण त्यांनी सांगितलं आम्ही एकनाथ शिंदे यांना सपोर्ट केलाय. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही फोन केले त्यांनी उचलले नाही . नंतर देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना देखील फोन केला होता की, तुम्हाला मुख्यमंत्री करतो. ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडायला तयार नव्हते. मात्र नंतर अजित पवार यांचा गट आमच्या सोबत आला, असे त्यांनी म्हटले आहे. ABP माझाने सदर वृत्त दिले आहे.