पंकजा मुंडेंसाठी बीडमध्ये अद्याप कुठल्याही भाजपाच्या बड्या नेत्याने सभा घेतल्याचे दिसून येत नाही. मात्र, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बीडमध्ये प्रचारासाठी येत आहे. मोदींच्या बीडमधील प्रचारसभेचा मुहूर्त ठरला असून 10 मे रोजी नरेंद्र मोदींची येथे सभा होणार आहे. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात झंझावाती प्रचार सुरू केला असून पंकजा यांच्यासह हिना गावित व सुजय विखे पाटील यांच्यासाठीही नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत आहे. त्यानुसार, नंदुरबार व अहमदनगरमध्ये 7 मे रोजी पंतप्रधानांच्या जाहीर सभा होत असून 10 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होत आहे.
मनोज जरागेंचं वास्तव्य असलेल्या बीडमध्ये मोदींची सभा होत असल्याने येथील मराठा समाज मोदींच्या सभेकडे कसं पाहतो, काय भूमिका घेतो, याची चर्चा होत आहे.