कॉलेजमध्ये असताना कोणी प्रपोज केलं होतं का? पंकजा मुंडे यांनी दिलं उत्तर.. व्हिडिओ

0
2816

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात मुलाखत पार पडली तेव्हा त्यांनी आपल्या कॉलेज जीवनाविषयी दिलखुलास उत्तर दिलं.

मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा गोपीनाथ मुंडेसाहेब गृहमंत्री होते. मला भरपूर सिक्युरिटी असायची. त्यामुळे शक्यतो माझ्याशी बोलायली लोक घाबरायचे. पण एकदा मैत्री झाली की झाली! मग ती कायम टिकली, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तुम्हाला कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नाही मला कुणी प्रपोज नाही केलं. तो सुखद अनुभव मला मिळाला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे जयहिंद कॉलेजला शिकल्या. तिथे त्यांना कधी कुणी प्रपोज केलंय का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.