Wednesday, May 15, 2024

नगर तालुक्यात विखे, कर्डिले यांचा झंझावाती प्रचार, मोदींच्या हॅटट्रिकसाठी महायुतीला साथ द्या…

नगर ।प्रतिनिधी
मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य देऊन केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुरक केला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते चिंचोडी पाटील येथील महायुचीच्या सभेत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह शेती क्षेत्रातील परिवर्तनाला गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांना आणि त्यांचे प्रयत्न सुरक्षित करणे, त्यांना तंत्रज्ञानाचे जाणकार बनवणे, कृषी संशोधन आणि शिक्षणाला चालना देणे आणि शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले जात असे त्यांनी खा. डॉ. विखे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, भाजप. ता. अध्यक्ष अशोक कार्ले, राष्टवादीचे ता. अध्यक्ष अशोक कोकाटे, मार्केट समितीचे माजी संचालक हरिभाऊ कर्डीले, शिवसेना ता. अध्यक्ष अजित दळवी, युवा सेना अध्यक्ष सचिन ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलेला न्यू इंडिया हा त्यांच्या सबका साथ, सबका विकास या ब्रीदवाक्यावर चालतो, आणि शेतकरी कल्याण हा त्याचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही परिवर्तनाचा प्रारंभिक जोर हा जागरूकतेतून येतो. आणि ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या संदर्भात, लॅब-टू-लँड, हर खेत को पानी आणि पर ड्रॉप मोअर क्रॉप यांसारख्या संदेशांच्या सरकारच्या प्रेरणादायी योजनांनी शेतीची उत्पादकता वाढली आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे काम जलद गतीने होत आहे .आपल्यासारख्या राष्ट्राची, जिथे जवळपास निम्मी कामगार शक्ती शेतीमध्ये गुंतलेली आहे, शेती शाश्वत केल्याशिवाय भरभराट होऊ शकत नाही. यामुळे तंत्रज्ञानापासून पीक विम्यापर्यंत, सुलभ कर्ज उपलब्धतेपासून ते आधुनिक सिंचन पद्धतींपर्यंत, संपूर्ण शेती चक्रामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक कृती योजना राबवून पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम सुरू केले आहे.
श्री अन्नाच्या माध्यमातून देशातील तृणधान्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यांचा त्यांचा निर्णय महत्वपुर्ण ठरला. असे डॉ. खा. विखे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांचा विकास होत आहे. येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार मार्फत विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा खासदार बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला निवडुण आणण्याची जबाबदारी आपली आहे. आणि ही जबाबदारी प्रत्येक कार्यकर्ता काटेकोरपणे पार पाडील असा विश्वास जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles