व्हिडीओमध्ये तुम्ही डुप्लीकेट कोल्डड्रिंक्स कसे तयार केले जातात ते पाहू शकता. आश्चर्याची बाब म्हणजे हे लोक चक्क कोकाकोला सारख्या जगप्रसिद्ध ब्रँडचे कोल्डड्रिक्स तयार केले जात आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही काही लोकांना डुप्लीकेट कोल्डड्रिंक्स तयार करताना पाहू शकता. एक भलामोठा टब दिसतोय त्यामध्ये काळ्या रंगाचं सरबत आहे. हे सरबत तो बाटल्यांमध्ये भरतोय आणि दुसरा व्यक्ती एका मोठ्याशा सिलिंडरमधून बाटल्यांमध्ये कार्बन डायऑक्साइड भरतोय. या व्हिडीओमधील धक्कादायक बाब म्हणजे या बाटल्यांवर कोकाकोला या कंपनीचे स्टिकर्स आहेत. अन् हे स्टिकर अगदी खऱ्याखुऱ्या कोकाकोलासारखेच दिसतायेत. बरं, तुम्ही या खोलीमध्ये इतरही विविध प्रकारच्या कोल्डड्रिंक्सच्या बाटल्या पाहू शकता.