आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांना केले ‘हे’ आवाहन ते प्रश्न माझ्याकडे हक्काने….

0
18

नगर : गोकुळवाडी येथे विविध मूलभूत प्रश्न प्रलंबित होते ते सोडविण्यासाठी माजी नगरसेवक आरिफ शेख यांनी पाठपुरावा केला असून यामध्ये ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याची लाईन व रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे मार्गी लागणार आहे, त्यामुळे गोकुळवाडीतील नागरिकांचे अनेक दिवसाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे, जनतेचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जात असून नियोजनबद्ध दर्जेदार विकासाची कामे मार्गी लागत असल्याचा आनंद होत आहे नागरिकांनी विकासाच्या प्रश्नासाठी हक्काने माझ्याकडे येऊन सोडून घ्यावेत समाज हितासाठी विकासाची कामे मार्गी लावली जात आहे, मागील काळामध्ये गोकुळवाडी मध्ये मोठा हॉल निर्माण करून दिला आहे त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन होताना दिसत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
गोकुळवाडी सर्जेपुरा येथे माजी नगरसेवक आरिफ शेख यांच्या पाठपुराव्यातून व आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामाचा शुभारंभ संपन्न झाला, यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक आरिफ शेख, प्रा. माणिक विधाते, सागर मुर्तडकर, संतोष शिंदे, सुनील भोसले, सोपान भंडारी, तुकाराम भंडारे, डॉ. सुनील साळी,रमेश भोरे, सचिन बाबानी, अंकुश मोरे, शादाब शेख, सलीम सौदागर, दीपक इंगळे, संजय शिंदे, अर्शद शेख, राजू वाकुडे, मुकेश इंगळे, शामराव इंगळे आदी उपस्थित होते.
आरिफ शेख म्हणाले की, गोकुळवाडी परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक वास्तव्य करीत असून त्यांना विविध मूलभूत प्रश्नांना सामोरे जावे लागत होते त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला असून या परिसरातील पिण्याच्या पाण्याची लाईन,रस्ता काँक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन काम करण्यासाठी मोठ्या निधी प्राप्त झाला आहे विकास कामातून गोकुळ वाडी परिसराचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल असे ते म्हणाले,