एक लहान मुलीनं देवदास चित्रपटाचा जबरदस्त सीन रिक्रिएट करून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कियारा खन्ना असं या मुलीचं नाव असून चित्रपटांच्या अवघड मोनोलॉगचं रिक्रिएशन करण्यात माहिर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. कियाराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, देवदास चित्रपटातील एक सीनला कियाराने अप्रतिम अभिनय करून रिक्रिएट केलं आहे. पारो (ऐश्वर्या राय) आणि देव (शाहरुख खान) यांच्यात सुरु असलेला संवाद कियाराने तिच्या अभिनयाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, #चित्रपट#devdas मधली पारो…






