सध्या मराठी सिनेसृष्टीत धर्मवीर २ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमाचा २१ जुलै रोजी ट्रेलर लाँच झाला.धर्मवीर २ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाची व्याख्या नक्की काय हे सांगताना पाहायला मिळत आहेत. तसेच हिंदू-मुस्लिम दंगली, आनंद दिघे यांनी हिंदुत्वासाठी केलेला संघर्ष , एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यातील संभाषण या गोष्टी पाहायला मिळत आहेत. या ट्रेलरला युट्युब वर खूप पसंती मिळत असली तरी सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट सुद्धा लक्षवेधी ठरल्या आहेत. या ट्रेलरमध्ये कोणाशी तरी आघाडी करून विकलात तो भगवा धर्म असा एक डायलॉग दाखवला आहे. त्यावरुन लोकांनी त्याकाळात मविआ सरकार कुठे होतं असा प्रश्न उपस्थित केलाय. याशिवाय ट्रेलरच्या कमेंट सेक्शन मध्ये अनेक वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. काहींना हा ट्रेलर आवडलाय त्यामुळे त्यांनी सिनेमासाठी उत्सुकता दर्शवली आहे. तर एकाने चित्रपटातील एक गोंधळ लक्षात आणून देत म्हटले की, कोणाशी तरी आघाडी करून विकलात तो भगवा धर्म, काय लॉजिक आहे? असे दिघे साहेब २०१९ ला येऊन बोलले होते का त्यावेळी आघाडी होती तरी का? तर दुसऱ्याने लिहिले की, गद्दारांचा उद्धातीकरण आहे सिनेमात हे उघड दिसतंय.






