दिंडोरी तालुक्यातील दोन शिक्षकांची हाणामारी तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांनी गंभीर दखल घेत शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सुपुर्द केला होता. परंतू दोन महिने उलटूनही देखील कारवाई होत नसल्याने त्या हाणामारीचा व्हिडीओ माध्यमांमत प्रसारीत होवून देखील कारवाई होत नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ दखल दोन्ही शिक्षकांचे निलंबन केले आहे.
दिंडोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 येथे केंद्रप्रमुखांनी दि. 13 मार्च 2024 रोजी केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पूर्व-वैमनस्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 3 चे शिक्षक प्रवीण दिनकरराव देशमुख (दळवी) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर येथील धनंजय विष्णू क्षत्रिय या दोघांमध्ये हाणामारी झाली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दोन्ही शिक्षकांचे निलंबनाचे आदेश पारीत केले आहे. यामुळे नक्कीच शिक्षण विभागात प्रशासनाची दहशत निर्माण झाली असून या कारवाईने चुकीच्या गोष्टींना आळा बसणार असल्याची खात्री व्यक्त केली जात आहे







Satish waghmare
Comments are closed.