चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर आल्या आहेत. ‘कास्टिंग काउच’सारख्या प्रकाराला कित्येक अभिनेते तसेच अभिनेत्रीसुद्धा बळी पडल्या आहेत. आता पुन्हा स्त्रियांना मिळणाऱ्या या वागणुकीवर चर्चा होत आहे, निमित्त ठरला आहे तो एक व्हायरल होणारा व्हिडिओ. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक दिग्दर्शक एका प्रसिद्ध अभिनेत्रीला जबरदस्ती कीस करत असल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
ही घटना बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण अभिनेत्री मन्नारा चोप्राबरोबर घडली आहे. गेल्या काही वर्षांपासून मन्नारा ही तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘तिरागाबादरा सामी’ हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मन्नारा ही या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीझर लॉंचदरम्यानचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एस. रवीकुमार चौधरी हे मन्नाराला जबरदस्ती कीस करताना दिसत आहेत. मन्नाराच्या परवानगी शिवाय त्या दिग्दर्शकाने अशा पद्धतीने तिला कीस केल्याने सोशल मीडियावर सगळेच संताप व्यक्त करत आहेत. एकाने कॉमेंट केली आहे की, अशा लोकांवर त्वरित कारवाई करायला हवी. तर एकाने लिहिलं की, कॅमेरासमोर ही अवस्था आहे तर मग बंद दरवाज्यामागे काय काय चालत असेल?
Director kisses an actress earlier today!pic.twitter.com/JzyBbau45d
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) August 28, 2023