आषाढी एकादशीला करा हे उपाय, भगवान विष्णूंची होईल कृपा…

0
19

देवशयनी एकादशी २९ जून रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी तुम्ही पद्म पुराणात सांगितलेले हे ५ उपाय अवश्य करून पाहा.

पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूची पूजा करावी. संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूला दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने स्नान घालावे. यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपपावे. त्यांच्यासाठी मऊ पलंग, गादी, उशी, मच्छरदाणी यांची सुंदर व्यवस्था करावी. डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे.

पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात. अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा.

पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्मांचे फळ देते. म्हणूनच देवशयनी एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्न आणि पलंग दान करावे. या दिवशी दान केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल. यासोबतच माणसाच्या घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.