गेल्या वर्षभरापासून रखडलेला कंगना रणौत हिचा’इमर्जन्सी’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर समोर आलाय. कंगना रणौत इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर सिनेमा करणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच या सिनेमाची चर्चा होती. काही बदल आणि काही सीन्सला कात्री लावल्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दिला आहे. ट्रेलरची सुरुवात ही जयप्रकाश नारायण यांच्या सीनने होते. जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर आहेत. ते तत्कालीन प्रंतप्रधानांना पत्र लिहित आहेत. यानंतर देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची एन्ट्री होते. इंदिरा गांधी त्यांच्या कार्यालयात बसल्या आहेत. त्या म्हणतात की, ‘मैं ही कैबिनेट हूं… ‘ यानंतर बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, पोलिसांचा लाठीचार्ज आणि १९७१ च्या युद्धाची घोषणा…असं पाहायला मिळतं.






