Friday, May 3, 2024

अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचा आक्रोश, हृदयद्रावक व्हिडिओ

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतीचं नुकसान झाल्याने बळीराजावरील कर्जाचा भार आणखी वाढला आहे. अशात एका शेतकऱ्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अवकाळी पाऊस आल्याने कांद्याच्या शेतात संपूर्ण पाणी भरलं आहे. कांदा पूर्णता भिजला आहे. पाऊस ओसरल्यावर कष्टाने वाढवलेल्या शेताची पाहाणी करण्यासाठी शेतकरी तेथे पोहचला तेव्हा आपलं शेत पाहून तो ढसाढसा रडू लागला. मोठ मोठ्याने ओरडत या शेतकऱ्याने आक्रोश व्यक्त केलाय.निसर्गाने पडलेल्या पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मोठ्या मेहनतीने काळ्या मातीत घाम गाळून शेतकरी शेती करतो. संपूर्ण जगाचा तो पोशींदा असतो. मात्र निसर्गच त्याची साथ देत नाही त्यामुळे तो खचून जातो. अशा घटनांमुळे जास्त कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्येच्या घटना मोठ्याप्रमाणावर वाढल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles