सध्या काही लग्नांमध्ये आपल्या पार्टनरला इंप्रेस करण्यासाठी नवरी किंवा नवरदेव डान्स करतात. तर काही लग्नांमध्ये फक्त शो ऑफ केलं जातं. दिखावा म्हणून लोकं काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नसतो. हल्लीच्या काही लग्नांमध्ये वधू आणि वर दोघांकडेही हमखास फायरगन पाहायला मिळते. असाच फायरगनचा स्टंट एका नवरीला महागात पडला आहे.
फायर गनमध्ये साध्या बंदूकीतून आग निघत असते. फुलबाजा आणि सुरसुरीप्रमाणे अनेक जण या गनचा वापर करतात. तर आता एका लग्नात फायर गनमुळे नवरीचा चेहराच भाजला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाची लगबग सुरू आहे. नवरी नवरदेव आपला आनंद व्यक्त करत आहेत. पाहुण्यामंडळींनी एकच गर्दी केलीये. आता या सर्वांत इंप्रेशनसाठी वधू आणि वर दोघांच्याही हातात फायर गन दिल्या आहेत. नवरदेव आधी फायर गन उडवतो. त्यानंतर नवरी देखील फायर गन सुरु करते.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Video : बापरे! लग्नात फायर गनची शायनींग पडली महागात; नवरीचा चेहराच भाजला






