अभिनेते अमोल कोल्हे यांचं इतिहासावर किती प्रेम आहे हे आपण वारंवार पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका म्हटलं की अमोल कोल्हे यांचा चेहरा डोळ्यापुढे उभा राहतो. अमोल कोल्हे यांनी ‘गरुडझेप’ चित्रपटामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या टीझरमध्ये अमोल कोल्हे यांचा पाठमोरा भाग दिसत आहे. तसेच टीझरची सुरुवातच त्यांच्या दमदार संवादाने होते.
“भगवा दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही” हा संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका आणि त्यादरम्यान घडलेला प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.