गौतमी पाटीलने स्पष्ट सांगितला ‘फ्युचर प्लॅन’! म्हणाली…Video

0
59

गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण जितकं तगडं आहे तितकाच गौतमीचा फॅन बेस सुद्धा मजबूत आहे. फक्त तरुणच नव्हे तर महिला, लहान मुले, वयस्कर मंडळी सगळ्यांच्या मनात गौतमीचं क्रेज आहे. अलीकडेच अनेक वृत्तांमधून गौतमीच्या लग्नाबाबतच्या फ्युचर प्लॅनची चर्चा होती. गौतमी पाटील लग्न करणार? कसा नवरा निवडणार? कोणाला आमंत्रण देणार? या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत गौतमीने “आता लग्नाचा काही प्लॅन नाही जेव्हा असेल तेव्हा सांगेन पण आता माझ्या मागे का लागताय असे म्हटले होते. यावरून गौतमीचा लग्नाचा प्लॅन तर सध्या नाही हे स्पष्ट झाले होते. पण आता नव्याने व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून गौतमीने स्वतःच आपला फ्युचर प्लॅन सांगितला आहे.
खास मुलाखतीत आपल्या भविष्याविषयीच्या कल्पना सांगितल्या होत्या. गौतमीला भविष्यात काय करायचं आहे असे विचारताच त्यावर तिने, “मी आज ज्या पद्धतीने या क्षेत्रात आले तसं बाकी कोणत्या मुलीला करावं लागू नये यासाठी एक डान्स अकादमी सुरु करायची आहे” असे सांगितले होते. या व्हिडिओवर सुद्धा मला फसवून नाचायला लावलं असं लिहिलेलं आहे.