काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. एका अज्ञात तरुणाने गौतमी पाटील कपडे बदलत असताना तिचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता. यानंतर आरोपीनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
याप्रकरणी एका मुलीने विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पुणे पोलिसांनी आता एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. आरोपी तरुण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहे. कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर गौतमी पाटीलने पहिली प्रतिक्रिया दिली.
‘एबीपी माझा’शी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, “एकजण तरी सापडला ही चांगली गोष्ट आहे. पण अजून बरेचजण आरोपी आहेत, तेही लवकरात लवकर सापडतील. आरोपीला अटक झाली, ही बातमी माझ्यासाठी खूप चांगली आहे. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हा मी खूप तणावात होते. तेव्हाचा काळ माझ्यासाठी वाईट होता. आता मला छान वाटतंय.”