काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन हा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गौतमी व्हॅनिटी व्हॅन वापरते. याबाबत तिने एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.
गौतमी म्हणाली, “व्हॅनिटी व्हॅनचं पाहिजे असं माझं काही नाही. मी आधी पडद्याच्या रुममध्येही कपडे बदलले आहेत. पण माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी काळजी घेते. म्हणून मी व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली. त्यानंतर मी व्हॅनिटी व्हॅन असली पाहिजे, असं आयोजकांना सांगते. पण, जर व्हॅनिटी व्हॅन शक्य नसेल, तर चार भिंती असलेली व्यवस्थित रुम द्या, एवढंच माझं म्हणणं असतं.
गौतमी पाटीलच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीच्या डान्सवर आक्षेप घेत ती अश्लील डान्स करत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. त्यानंतर डान्समध्ये सुधारणा केल्याचं गौतमीचं म्हणणं आहे.
Home सांस्कृतिक कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल,म्हणून मी व्हॅनिटी व्हॅन वापरते..गौतमी पाटीलचा खुलासा