जिनिलीया व रितेश देशमुख यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यामध्ये रितेश-जिनिलीया एकत्र लोकप्रिय गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी १८ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा ‘अपना सपना मनी मनी’ हा कॉमेडीपट २००६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामधील ‘गिटार साँग’ सर्वत्र लोकप्रिय झालं होतं. आजही प्रत्येक समारंभात “दिल मैं बजी गिटार…” हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. या गाण्याचं मराठी व्हर्जन ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.