इफ्तार पार्टीत फोटोग्राफरने ‘वहिनी’ म्हणताच जिनिलियाने दिली गोड प्रतिक्रिया… Video

0
23

बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीला रितेश आणि जिनिलीया पोहोचतात रितेशने बाबा सिद्दिकी यांनी त्या दोघांचं स्वागत केलं. तर एंट्रीला बाबा सिद्दिकी यांनी त्यांच्याबरोबर फोटोही काढला. त्यांचा फोटो काढून झाल्यावर बाबा सिद्दिकी बाजूला झाले आणि फोटोग्राफर रितेश जिनिलीयाकडे फोटोसाठी पोझ देण्याची मागणी करू लागले. रितेश आणि जिनिलीयाने देखील हसत हसत फोटोग्राफर्सची मागणी मान्य केली आणि फोटोंना पोझ दिल्या. तर यावेळी एका फोटोग्राफरने जिनिलीयाला वहिनी अशी हाक मारली. ही हाक ऐकू आल्यावर जिनिलीयाचं लक्ष लगेच त्या फोटोग्राफरकडे गेलं. तिने फोटोग्राफरकडे पाहिलं आणि ती खळखळून हसली.