Gold- Price :सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

0
9

Gold-Silver Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. पण चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत…

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,२८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८५,३६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,७३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.